लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आयुष्यमान भारत योजनेंतर्गत नागरिकांना तब्बल १३०० आजारांवर उपचार करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. यासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढे येत सीएससी सेंटर वअधिकृत रुग्णालयांमध्ये नोंदणी करून सुवर्णपत्र (गोल्डन कार्ड) काढून घेणे गरजेचे आहे.आरोग्य विभागाच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य तथा आयुष्यमान भारत योजनेचा सर्वसामान्यांना लाभ दिला जातो. बुलढाणा जिल्ह्यात ७लाख २ हजार २२३ लाभार्थी या योजनेसाठी पात्र असून आतापर्यंत २ लाख ७० हजार ८६१ लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड काढून घेतले आहे. अजूनही जिल्यात पात्र असतांनाही ४ लाख ३१ हजार ३७२ लाभाथीर्चे गोल्डन कार्ड काढणे बाकी आहे अगोदरच महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यरत आहे. सध्या आरोग्य विभागाकडून या दोन्ही योजना एकत्रिपणे राबविल्या जात आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंत तर आयुष्यमान भारत अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. यासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी काही निकष ठरवून लाभाथी निवडले आहेत. तसेच यादीत आपले नाव आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी आणि अडचणी दुर करण्यासाठी १४५५५ हा टोल फ्री क्रमांकही देण्यात आलेला आहे. दरम्यान, योजना सुरू होण्यापूर्वी योजनांची माहिती देणारे पुस्तिका नागरिकांना देण्यात आली होती. हेच कार्ड असल्याचा गैरसमज असल्याने लाभार्थी नागरिक नोंदणीसाठी पुढे येत नसल्याचे सांगण्यात येत आहे परंतु योजनाचा लाभ घेण्यासाठीदिलेले रुग्णालये व सीएससी सेंटरवरून नोंदणी करून कार्ड काढणे आवशयक आहे. नागरिकांनी सर्व गैरसमज दुर करून स्वत: पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे. नोंदणी करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
नागरिकानी गैरसमज बाळगू नये. काही अडचण वाटल्यास जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सामान्य रुग्णालयात संपर्क साधावा. १३०० विविध आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. यासाठी नोंदणी करून गोल्डन कार्ड घेण्याची गरज आहे. आमच्याकडून जनजागृती सुरुच आहे. नागरिकांनी पुढे यावे.-डॉ.विवेक सावकेसमन्वयक राज्य आरोग्य सोसायटी, म.जो.फु.आ.यो जिल्हा बुलडाणा.