लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: तालुक्यातील हत्ता येथील १९ वर्षीय विवाहितेला तूर फवारणीचे औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह चार जणांना विरोधात पोलिसांनी गुरूवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. पती मंगेश गोवर्धन पवार , सासरे गोवर्धन सुखलाल पवार, सासू सरला गोवर्धन पवार, दीर मुकेश गोवर्धन पवार यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.पीडित विवाहीता ही शेतात एकटी काम करीत असताना तू आम्हाला पसंद नाही, लग्नात हुंडा कमी दिला असे म्हणत विवाहीतेला औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरूवारी सकाळी आठ वाजता तिला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा हा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष महिलेचा जबाब नोंदविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सासर्यास अटक केली असून चारही जणाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करीत आहेत.
विवाहीतेला जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:02 IST
लोणार तालुक्यातील हत्ता येथील १९ वर्षीय विवाहितेला तूर फवारणीचे औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह चार जणांना विरोधात पोलिसांनी गुरूवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
विवाहीतेला जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एकास अटक
ठळक मुद्देविवाहीतेला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होतापतीसह चार जणांवर गुन्हे दाखल; सास-यास अटक