बुलढाणा : शहरालगत असलेल्या देऊळगाव येथील फाेटाे स्टुडीओला शाॅर्ट सर्किटमुळे आग लागून साहित्य खाक झाले़ ही घटना २० सप्टेंबर राेजी दुपारी १२ वाजता उघडकीस आली़ यामध्ये जवळपास सहा लाखांच्यावर नुकसान झाले आहे.
देऊघाट येथील धिरज अनिल काटेकर यांच्या फाेटाे स्टुडीओला शाॅर्टसर्किटमुळे २० सप्टेंबर राेजी आग लागली़ या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने काटेकर यांचे सहा लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे़ दुकानातील कॅमेरा किंमत दाेन लाख ५० हजार, शुटींग कॅमेरा किंमात १ लाख ५५ हजार, ड्रोन कॅमेरा किंमत १ लाख ३५ हजार व इतर साहित्य असे सहा लाखांच्यावर साहित्य जळून खाक झाले आहे़ घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे.