जानेफळ (जि. बुलडाणा), दि. २- मेहकर तालुक्यातील उटी येथे १ एप्रिलच्या रात्री १0 वाजताच्या सुमारास अचानक आग लागून जवळपास ११ घरे व चार गोठे जळून खाक झाले. यामध्ये दोन बैल, चार बकर्या, कोंबड्या, घरातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. यामध्ये जवळपास २१ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.२ एप्रिल रोजी आगीमध्ये झालेल्या नुकसानाचा पंचनामा तलाठी बोरे, सोळंके, सवडतकर आदींनी केला. यामध्ये रमेश नामदेव आंधळे यांचे घर व गोठा जळाल्याने १ लाख ७0 हजार रुपयांचे नुकसान झाले. शहनाजबी सरदारखा पठाण यांचे घर व गोठा जळून ६६ हजार २00 रुपयांचे नुकसान झाले. सरदारखा चाँदखा पठाण यांचे घर व गोठा जळून ८९ हजारांचे नुकसान झाले. धृपदाबाई नामदेव आंधळे यांचे घर व गोठा जळून १ लाख ९ हजार ५00 रुपयांचे नुकसान झाले. जुरावरखा गफुरखा यांचे १ लाख ४२ हजार ५00 रुपयांचे नुकसान झाले. अलताफखा सरदारखा पठाण यांचे घर व गोठा जळून ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले. फिरोजखा रहिमखा पठाण यांचे घर व गोठा जळून १ लाख ८0 हजार ५00 रुपयांचे नुकसान झाले. सुनील दिनकर आंधळे यांचे घर व गोठा जळून १ लाख ६५ हजारांचे नुकसान झाले. दिनकर नामदेव आंधळे यांचे घर व गोठा जळून १ लाख ११ हजार रुपयांचे नुकसान झाले. रोशनखा इनायतखा पठाण यांचे २ लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. शेख सादीक शेख हसन यांचे १ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झाले. चाँदखा इनायतखा पठाण यांचे दोन बैल, चार शेळ्या व इतर साहित्य मिळून २ लाख ५७ हजारांचे नुकसान झाले. शे.राजू शे.रज्जाक यांचे २ लाख ७१ हजार रुपयांचे नुकसान झाले. शे.हारुण शे.नूर यांचे ८0 हजार रुपयांचे नुकसान झाले. प्रल्हाद सखाराम आंधळे यांचे घर व गोठा जळून १ लाख ७ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रमाणे एकूण २१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूलच्या संबंधित अधिकार्यांनी केला आहे. प्रतापराव जाधव यांची उटी येथे भेटखा. प्रतापराव जाधव यांनी २ एप्रिल रोजी उटी येथे भेट देऊन आगीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. यावेळी पं.स. सभापती जयाताई खंडारे, सुरेश वाळूकर, समाधान साबळे, दत्ता पाटील शेळके, तहसीलदार संतोष काकड आदी उपस्थित होते.नुकसानग्रस्तांना टिनपत्रे व कपड्यांचे वाटपआगीमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबाला काँग्रेसकडून प्रत्येकी पाच टिनपत्रे, महिला व पुरुषांना काँग्रेसचे विधानसभा नेते लक्ष्मणराव घुमरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार, माजी जि.प.सदस्य कैलास चवरे, माजी पं.स.सदस्य गजानन वडणकर, हावरे, विष्णुपंत पाखरे, तुकाराम चव्हाण आदी उपस्थित होते.
आगीचे तांडवात ११ घरे, चार गोठे जळून खाक!
By admin | Published: April 03, 2017 3:11 AM