सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास विद्युत स्पार्किंगमुळे मेहकर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगरपरिषद समोरच्या हादिमिया कॉम्प्लेक्समधील बालाजी स्वीट मार्ट दुकानात अंदाजे विद्युत स्पार्किंगमुळे भीषण आग लागली. या दुकानाच्या वरील मजल्यावर राहणाऱ्या तारीक खान यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने, त्यांनी तत्काळ सतर्कता दाखवत दुकानाचे शटर तोडून भरलेले दोन गॅस सिलिंडर तत्काळ बाहेर काढले. त्यामुळे मोठा अपघात टळला, तसेच तारीक खान यांनी घरच्या पाण्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मेहकर नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. अखेरीस रात्री अडीच वाजताच्या सुमारास आग विझविण्यात आली. मात्र, तोपर्यंत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. यामध्ये लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी तारिक खान, काँग्रेसचे गटनेते आलिम ताहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आफताब खान, सुमेर खान,तौसिफ खान, पोलीस उपनिरीक्षक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक घुले, हेड कॉन्स्टेबल श्रीराम निळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लोढे, रामेश्वर रिंढे, आरोग्य निरीक्षक विशाल शिरपुरकर, इलेक्ट्रिशियन नारायण इंगळे, गजानन कुलाळ, नसीर खान, तेजुसिंग आदींनी अथक परिश्रम घेतले.
मेहकरात स्वीट मार्टला आग, लाखाेंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:34 AM