जय माता दी मित्र परिवाराच्या शिबिरात १०५ जणांचे रक्तदान !
कोरोना काळात गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या जय माता दी मित्र परिवाराच्या वतीने ३ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक गजानन तारू यांच्या आवाहनास तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात १०४ जणांनी रक्तदान केले.
स्थानिक सुखकर्ता सांस्कृतिक भवनमध्ये शिबीर पार पडले. आमदार श्वेता महाले, माजी आ. राहुल बोंद्रे आदी मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. शिबिरासाठी गजानन तारू, शिवराज पाटील, रोहित खेडेकर, किशोर कदम, दीपक पवार, संतोष तारू, शेख जफर, आसिफ शेख, राजेश कऱ्हाडे, मुकेश पडघान, प्रवीण वायाळ, शैलेश आय्या, निरज चौधरी, दीपक श्रीवास्तव, पवन चोपडा, मयूर गीते, विजय गाडेकर, विजय भुतेकर, स्वप्नील कऱ्हाडे, गजानन म.पाटील, श्रीकांत टेहरे, शेषराव सुरडकर, यासीन शेख आदींसह जय माता दी मित्र परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेतला होता. रक्तसंकलन लोकमान्य ब्लड बँक औरंगाबाद व जीवनधारा ब्लड बँक बुलडाणा यांनी केले.
बालाजी बहुउद्देशीय संस्थेच्या शिबिरात १२४ जणांचे रक्तदान !
चिखली : येथील श्री बालाजी बहुउद्देशीय संस्थेतर्फे २९ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १२४ दात्यांनी रक्तदान केले. स्थानिक मौनी महाराज संस्थानमध्ये पार पडलेल्या या रक्तदान शिबिराला शहरातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदात्यांना आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या शिबिराला मौनी महाराज संस्थानचे सचिव प्रेमराज भाला, सुनील लाहोटी, आदेश राऊत यांनी भेट दिली. जीवनधारा ब्लड बँक, लिलावती ब्लड बँक आणि मौनीबाबा संस्थानचे या शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष संतोष अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.