लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: हिंदू संस्कृतीत मनुष्यावर मृत्यूनंतर पारंपारीक लाकडाच्या साहाय्याने अंतिम म्हणजेच अग्नीसंकार करण्यात येतात. मात्र, लाकडांची असलेली कमतरता आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने आधुनिक युगात आता अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनीचा उपयोग केल्या जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पहिली विद्युत शवदाहिनी खामगाव येथे आणण्यात आली आहे.खामगाव शहरात हिंदू धर्मियांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन स्मशानभूमी आहेत. यामध्ये चिखली रोडीवरील ओंकारेश्वर स्मशानभूमी आणि रायगड कॉलनीतील मुक्तीधाम स्मशानभूमीचा समावेश आहे. या दोन्ही स्मशानभूमीत आतापर्यंत हिंदू रितीरिवाज आणि संस्कृतीनुसार लाकडे जाळून अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र, या पध्दतीत पर्यावरणाचा ºहास आणि वेळ जास्त लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आधुनिकतेची कास धरत आता खामगावातील मुक्तीधाममध्ये शहरातील एका सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आधुनिक शवदाहिनी उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये पालिका प्रशासन, आ. अॅड. आकाश फुंडकरांनी सहकार्य केले. ३० लक्ष रुपये खर्चाच्या या शवदाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे.जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी!खामगाव येथील मुक्तीधाम स्मशानभुमीतील अत्याधुनिक शवदाहिनी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. या शवदाहिनीत शव ठेवण्यात आल्यानंतर अवघ्या दोन तासात विधिवत पध्दतीने शवाचे दहन होईल. तसेच या दाहिनीतून निघणारा धूर फिल्टर होऊन निघेल. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल.