धामणगांवबढे: अवघे एक महिन्यापूर्वी दोन लक्ष रुपये खर्चुन बांधण्यातआलेल्या पुलाचे निकृष्ट बांधकामाचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले. १३जूनच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसात पुलालामध्ये खिंडार पडले असूनदोन्ही बाजुंनी पुल वाहून गेला. जि.प.फंडातून या नदीवर पुलाचे बांधकाम पंचायत समिती मोताळा संबंधीतविभागाच्या देखरेखखाली ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आले. कुरेशीकब्रस्थानमध्ये जाण्यासाठी हा पुल नदीवर बांधण्यात आला होता. मोताळापंचायत समितीच्या संबंधित विभागाशी तसेच ग्रामपंचायतच्या कारभाराचीलक्तरे यामुळे वेशिवर टांगली तर शासनाच्या पैशाचा अपव्यय समोर आला.संबंधित कामाच्या निकृष्ठ दर्जाबाबत ग्रामपंचायत सदस्य गजानन घोंगडेयांनी १८ एप्रिल २०१७ रोजी गटविकास अधिकारी मोताळा व कार्यकारी अधिकारीबुलडाणा यांचेकडे तक्रार केली होती. पहिल्याच पावसात पुलास भगदाड पडले.या प्रकरणाच्या चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्य गजानन घोंगडेसहनागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
पहिल्याच पावसात पुल गेला वाहून
By admin | Published: June 16, 2017 1:31 PM