शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने राज्य शासनाने कृषी विभागामार्फत राज्यस्तरीय पीक स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये तालुकास्तरावर सवणा येथील विजय भुतेकर सवना यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. भुतेकर यांनी हेक्टरी ३२ क्विंटल ५० किलो इतके विक्रमी उत्पादन हरभरा पिकातून गत हंगामात घेतले आहे. या भागातील प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे, तर कोलारा येथील गजानन सोळंकी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांनी हेक्टरी ३२ क्विंटल उत्पादन घेतले आहे. कोलारा येथील राजू सोळंकी ३१ क्विंटल ८० किलो उत्पादन घेऊन तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. पुरस्कारप्राप्त या शेतकऱ्यांचा कृषी दिनानिमित्त चिखली पंचायत समिती सभापती सिंधू तायडे, उपसभापती शमशाद पटेल, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे व संदीप सोनुने यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तरीय पीक स्पर्धेत विजय भुतेकर तालुक्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:24 AM