बुलडाणा : भाग्योदय शारदा मंडळाच्या ११ व्या वर्षानिमित्त शारदा माता मिरवणूक आज शहरातील श्री गणेश मंदिर परिसरातून काढण्यात आली. यावेळी महिला ढोल ताशा पथकाचा सहभाग हा लक्षवेधी ठरला. विशेष म्हणजे हे महिलांचे ढोल पथक बुलडाणा जिल्ह्यातील पहिले महिला ढोल पथक ठरले आहे. अल्पावधीतच परिङ्म्रम व सराव करून महिलांनी या पथकाची निर्मिती केली असून, आज दुर्गा विसर्जन मिरवणुकीत महिलांच्या ढोलताशा पथकाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. आज ५ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध चौकांमधून शारदा मातेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी महिलांच्या ढोलताशा पथकाने बुलडाणा शहर दुमदुमून सोडले. भाग्योदय महिला ढोलताशा पथकाच्या प्रमुख सुवर्णा देशमुख यांच्या नेतृत्वात ५0 महिला सहभागी झाल्या होत्या. यात वैशाली जोशी, वर्षा महाजन, स्मिता चेकटकर, कल्पना जोशी, अरुणा महाजन, संध्या जोशी, ज्योती जोशी, आरती जोशी, डहाळे, लक्ष्मी चवरे, स्मिता शास्त्री, विजयंता देशपांडे, अश्विनी वाईकर, योजना जोशी, अनुजा जोशी, नूतन जोशी, कविता देशमुख, अंजली काणे, उमा महाजन, कल्पना भालेराव, लक्ष्मी खुराणा, कल्पना भगत, अक्षता भंडारी, डहाके याचा सहभाग होता. शिवाय या महिला पथकास प्रशिक्षण देण्यासाठी शुभम खोडके, अजिक्य कुळकर्णी, अजय खोत, विजय परांजपे यांनी परिश्रम घेतले.
बुलडाण्यातील पहिले महिला ढोलताशा पथक
By admin | Published: October 05, 2014 11:54 PM