मागील काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण शैक्षणिक, आर्थिक आणि नोकरी संदर्भात दिले होते. २०१४ मध्ये दिलेले हे आरक्षण सत्ता बदल झाल्यामुळे टिकू शकले नाही. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाकडे सर्वच बाबींमधून दुरुस्ती करण्यात आली. मुस्लिम समाज अल्पसंख्यांक असल्यामुळे खंबीर नेतृत्व नसल्यामुळे या समाजाच्या अनेक समस्या आहेत. त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे मुस्लिम समाज बांधवांचा समज आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार असून, सुरुवातीपासून काँग्रेस सोबत असलेला हा समाज आज काँग्रेसच्या शासनावर विश्वास करीत आहे. अनेक दिवसापासून असलेली मुस्लिमांच्या मागासलेपण याबाबत नोकरी, आर्थिक शिक्षणामधील आरक्षण लागू करण्याकरिता प्रयत्न करून सच्चर समितीच्या शिफारशी लागू करून मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावे, याकरिता अल्पसंख्यांक विभाग बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष शेख रहमान कुरेशी यांनी निवेदन दिले आहे.
मुस्लिमांना दिलेले पाच टक्के आरक्षण लागू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:39 AM