सध्या सर्वत्र कोरोना रूग्णसंख्या कमी होत असताना ग्रामीण भागात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच आहे. डोणगाव येथे २८ मे रोजी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. या कोरोना चाचणीमध्ये डोणगाव येथील चार जण तर एक जण इतर गावातील पॉझिटिव्ह निघाला. डोणगाव येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले त्यांनी स्थानिक कोरोना विलगीकरण कक्षामध्ये जाऊन उपचार करून घ्यावे व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, ज्याने कोरोना प्रादुर्भाव इतरांना होणार नाही, याची काळजी घ्या व लक्षणे आढळल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
डोणगाव येथे पाच कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:26 AM