लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरेना बाधीतांची संख्या संख्या सध्या घटत असली तरी मंगळवारी तब्बल पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना संसर्गाचे संकट अद्यापही टळले नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी २५ जण कोरोना बाधीत आढळून आले.दरम्यान, मृत्यू पावलेल्यांमध्ये धाड येथील ४५ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा शहरातील जिजाऊनगरमधील ५५ वर्षीय व्यक्ती, सागवन येथील ३५ वर्षाचा व्यक्ती, देऊळगाव मही येथील ७३ वर्षीय व्यक्ती तर शेगाव तालुक्यातील जलंब येथील ९१ वर्षाच्या व्यक्तीचा मृतामध्ये समावेश आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नव्हता. त्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र १३ आॅक्टोबर रोजी एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याचे स्पष्ट होत आहे.दुसरीकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्टद्वारे तपासणी करण्यात आलेल्या २४५ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी २२० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये सावखेड नागरे येथील एक, देऊळगाव मही येथील चार, चिखली येथील एक, मेरा बुद्रूक येथील एक, निंबारी येथील एक, मलकापूर शहरातील एक, शारा येथील एक, लोणारमधील एक, मेहकर दोन, उकळी तीन, हिवरा आश्रम एक, घाटपुरी एक, खामगाव सहा, नांदुरा एक, या प्रमाणे कोरोनाबाधीत आढळून आहे.दरम्यान, कोरोनावर मात करणाऱ्या ९१ जणांना मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा आयुर्वेदिक महाविदलयाच्या कोवीड केअर सेंटरमधून ३५, अपंग विद्यालयाच्या सेंटरमधून दहा, खामगाव एक, नांदुरा सात, देऊळगाव राजा नऊ, चिखली एक, लोणार १२, सिंदखेड राजा दहा आणि मेहकर येथील कोवीड केअर सेंटरमधून सहा जणांना सुटी देण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात पाच कोरोनाबाधीतांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:11 AM