शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जिल्ह्यात कोरोनाचे पाच बळी, ६६५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:31 AM

प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४०६ व रॅपीड टेस्टमधील २५९ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ४०४ तर रॅपिड टेस्टमधील ...

प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४०६ व रॅपीड टेस्टमधील २५९ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ४०४ तर रॅपिड टेस्टमधील ४९१७ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा शहरात ४९, तालुक्यात डोंगरखंडाळा, रायपूर, सुंदरखेड, पाडळी, पिं. सराई, चांडोळ, इरला, म्हसला, करडी, ढालसावंगी, रूईखेड, धाड, येळगांव, देऊळघाट, सागवन, कोलवड, भादोला याठिकाणी रुग्ण सापडले आहेत. मोताळा शहर १३, खामगांव शहर ४०, शेगांव शहर ४०, मलकापूर शहर १७, मलकापूर तालुक्यातील दाताळा ३, पिंपळखुटा दोन, धरणगांव तीन, दुधलगांव १, भालेगांव १, नरवेल १, देऊळगाव राजा शहर ११, दे. राजा तालुक्यातील सातेफळ २, सावखेड नागरे १, सिनगांव जहा दोन, खल्याळ गव्हाण २, सावखेड भोई २, पिंपळखुटा १, दे. मही ३, डोढ्रा एक, अंढेरा १ रुग्ण सापडला. सिंदखेड राजा शहरात २८, मेहकर शहर ४३, मेहकर तालुक्यातील गोहेगाव दोन, हिवरा आश्रम सहा, पांगरखेड एक, करंजी, सारंगपूर, लोणी गवळी, गुंजखेड, लव्हाळा चार, दे. माळी तीन, चिंचोली बोरे, अंजनी खु, शेंदला, पेनटाकळी, जानेफळ, मोहदरी, वाकड, मोहणा, डोणगांव पाच, नायगांव देशमुख ३, गुंज पाच, नागापूर एक, कनका येथे रुग्ण आढळून आले. संग्रामपूर शहरात १४, जळगांव जामोद शहरात १२, नांदुरा तालुक्यात बुर्टी दोन, पोटा दोन, लोणार शहरात १७, लोणार तालुक्यातील वढव दोन, रायगांव चार, बिबी, वझर आघाव, हत्ता, ताडेगांव, मातमळ, पहुर, सुलतानपूर २६, देऊळगांव चार व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ६६५ रूग्ण आढळले आहे.

याठिकाणी झाले मृत्यू

जिल्ह्यात पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील ६० वर्षीय पुरूष, छत्रपती नगर बुलडाणा येथील ६० वर्षीय पुरूष, मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील ८० वर्षीय पुरूष, मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथील ५३ वर्षीय पुरूष व मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ५५ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.