लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगांवराजा : बनावट दस्तऐवज तयार करुन भुखंडाच्या बेकायदा अंतिम रेखांकन नोंदी प्रकरणातील त्या चार पालीका कर्मचाऱ्यांना आज दि.२९ ला न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणात अटक पूर्व जामीन मिळालेल्या भुखंड मालकी ही चौकशीच्या फेऱ्यात येणार असे संकेत पोलिस सुत्रांकडून मिळाले आहे.शहरालगतच्या गट क्रमांक ९१(१) व ८६ मधील २६८ भुखंडाच्या पालिका दप्तरी अंतीम रेखांकन नोंदीसाठी चार कर्मचाऱ्यांनी संगणमत करुन बनावट दस्तऐवज तयार करुन प्रभारी मुख्याधिकारी असलेल्या तहसिलदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्या होत्या. सदर प्रकरणात उच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन नाकारल्याने खामगांव पालिकेत कार्यरत मनोज पवार, सिंदखेडराजा पालिकेतील कर्मचारी एन.एन.इंगळे यांच्यासह देऊळगांवराजा पालिकेत कार्यरत लेखा विभागातील राजेश अग्रवाल कर विभागातील रमेश तौर पोलिसांना शरण आले. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या चारही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करुन पोलिस कोठडी मागीतली असता न्यायालयाने ५ दिवस ३ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत पाठविल्याचे आदेश दिले.भुखंड मालकही येणार चौकशीच्या फेऱ्यात दरम्यान सदर प्रकरणात अटकपुर्व जामीन मिळालेले भुखंड मालक ही आरोपी आहे त्यांनाही वेळ पडल्यास चौकशीसाठी ताब्यात घेवू अशी प्रतिक्रिया ठाणेदार सारंग नवलकार यांनी बोलतांना दिली.
भूखंडप्रकरणी आरोपींना पाच दिवसांची कोठडी
By admin | Published: July 01, 2017 12:25 AM