लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २७७८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २१४४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६३४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ५०० व रॅपीड टेस्टमधील १३४ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ५५५, तर रॅपिड टेस्टमधील १५८९ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा शहर ९५, तालुक्यातील रायपूर, पांगरी, सव, ढालसावंगी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. मोताळा तालुक्यातील मुर्ती, धामणगाव बढे, धोनखेडा, टेंभी येथे तीन रुग्ण आढळून आले आहेत. खामगांव शहरात ३९, तालुक्यातील सुटाळा तीन, कोलोरी, आमसरी, नागापूर येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. शेगांव येथे पाच, चिखली शहरात ३१, तालुक्यातील खैरव, उंद्री, बेराळा, शेलगांव आटोळ, तेल्हारा, शेलोडी, अंचरवाडी येथे प्रत्येकी एक, अमडापूर व बोरगांव काकडे तीन, मलकापूर शहर तीन, देऊळगाव राजा शहरात २९, सिंदखेड राजा शहरात १४, साखरखेर्डा येथे १५, नाव्हा येथे एक, मलकापूर पांग्रा दोन, मेहकर शहरात ४७, हिवरा आश्रम आठ, डोणगांव पाच, लव्हाळा पाच, संग्रामपूर शहरात एक, जळगांव जामोद शहरात एक, नांदुरा शहरात १०, वडनेर येथे ५५, लोणार शहरात १६, बिबी येथे ४, मांडवा पाच, मातमळ १०, कुऱ्हा चार, किन्ही सात, बोरी काकडे आठ, धायफळ चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू ; ६३४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 12:31 PM