शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

संघटीत गुन्हे करणारे पाच जण तडीपार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 6:39 PM

बुलडाणा : जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्या तीन टोळ््यांपैकी एका टोळीत पाच जणांना जिल्हा पोलिस अधीक्षकानी आगामी सहा महिन्यासाठी घाटाखालील सहा तालुक्यातून हद्दपार केले आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्या तीन टोळ््यांपैकी एका टोळीत पाच जणांना जिल्हा पोलिस अधीक्षकानी आगामी सहा महिन्यासाठी घाटाखालील सहा तालुक्यातून हद्दपार केले आहे. दरम्यान, संघटीत गुन्हे करणार्या आणखी दोन टोळ््यातील सदस्यही हद्दपारीच्या उंबरठ्यावर असून कायदेशीर प्रक्रिया पूर्णत्वास जाताच त्यांनाही प्रसंगी जिल्ह्यातून हद्दपार केले जाण्याचे संकेत आहेत. सहा तालुक्यातून हद्दपार करण्यात आलेले पाचही जण हे मलकापूर येथील असून त्यांच्यावर गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये टोळीप्रमुख शहजार खान सलीम खान (३०, रा. मालवीयपुरा) त्याचे साथीदार मोहम्मद दानीश शेख रशीद (२६, रा. रायकल पुरा), शेख शाहीद अहमद अ. सलमान (३०, रा. मोहनपुरा), अतिकुर रहेमान शफीकुर रहेमान (३३, रा. पांढरी, पारपेठ,), शेक आरिफ शेख अहमद (३५, रा. फातेमानगर) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण मलकापूर शहरातील रहिवासी आहेत. या सर्व आरोपींवर खुनाचा प्रयत्न, दंगल घडविणे, दंगलीत घातक हत्यारांचा वापर करणे, सरकारी नोकराच्या कामात अडथळा निर्माण करणे व त्यांच्यावर हल्ला करणे, अत्यावश्यक वस्तूंची काळाबाजारी करणे, शासकीय व खासगी मालमत्तेचे नुकसान करणे अशा स्वरुपाचे गंभीर व शारीरिक नुकसान करणारे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. मलकापूर शहर आणि दसरखेड (एमआयडीसी) पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, त्यांच्या विरोधात वेळोवेळी कायदेशीर व प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली नव्हती. उलटपक्षी त्यांच्या वास्तव्यामुळे व हालचालीमुळे मलकापूर शहर, मलकापूर तालुका व परिसरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात संबंधित परिसरातील नागरिकही पोलिसांत तक्रार देण्यास धजावत नव्हते. प्रकरणी या टोळीचे मलकापूर परिसरातील वास्तव्यामुळे त्यांचे बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी, त्यांना हिंसेपासून परावृत्त करण्यासाठी, नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पाचही जणांना महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ च्या कलम ५५ (१) प्रमाणे किमान दोन वर्षा च्या कालावधीसाठी बुलडाणा, जळगाव व अकोला जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करण्याचा प्रस्ताव मलकापूर पोलिस ठाण्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्यानुषंगाने पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ५५नुसार टोळ््यांची पांगापांगमद्ये देण्यात आलेल्या तरतुदीसह अन्य कलमांचा आधार प्राप्त कायदेशीर अधिकाराचा वापर करत उपरोक्त पाचही जणांना नांदुरा, मोताळा, जळगाव जामोद, खामगाव तालुक्यातून १४ सप्टेंबरला हद्दपार करण्याचे आदेश पारीत केले आहेत. यासंदर्भात मलकापूर शहर पोलिस आणि मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा चौकशी अहवाल आणि पुरावे विचारात घेऊन हे आदेश दिल्या गेले असल्याची माहिती आहे. ४८ तासांची दिली होती मुदत सहा तालुक्यात पाचही जणांना हद्दपार केल्यानंतर मलकापूर शहर सोडण्यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. दरम्यान, पाचही आरोपी हे स्वच्छेने अन्यत्र जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र हद्दपारीचा आदेश झालेल्या सहाही तालुक्याबाहेर जेथे ते जातील तेथील पोलिसांना त्यांना त्याबाबत सुचनाही द्यावी लागणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी