लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: विदर्भाच्या प्रवेद्वारी गेल्या तीन दिवस खळबळ उडवून देणाऱ्या १६ वर्षीय विद्याथीर्नीच्या म्रुत्युप्रकरणी पोलिसांची पाच पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली आहे. या प्रकरणी घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. येथील शिवाजी नगरातील रहीवाशी १६ वर्षीय विद्यार्थीनी १३ जानेवारीरोजी शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली. ती घरी परतलीच नाही. तिचा मृतदेह मध्य प्रदेशातील नेपानगर रेल्वे स्थानकानजीक आढळून आला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.रविवारी रात्री शेकडो पुरुष महीलांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.तर सोमवारी पुन्हा नागरिक रस्त्यावर उतरले होते. गेल्या तीन दिवसापासून या घटनेमुळे शहरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणी मलकापूर पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी आज मंगळवारी दिली आहे. त्यात एक पथक नेपानगरात तळ देवून चौकशी करित आहे. एका पथकाची भुसावळ रेल्वे स्थानकावरील फेरीवाल्यांकडे चौकशी करीत आहेत. त्याचबरोबर संबधीत विद्याथीर्नीच्या मैत्रीणीकरवी माहीती घेण्यात येत आहे. सायबर क्राईम शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली असल्याचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, प्रकरणाचा तपासाकडे मलकापूरवासियांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)