शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

पाच हजार लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत!

By admin | Published: June 01, 2017 12:37 AM

इतर, खुल्या प्रवर्गासाठी सात वर्षात १७० घरकुले

संदीप गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : गेल्या सात ते आठ वर्षांपासून घरकुल उद्दिष्ट व प्रवर्गनिहाय लोकसंख्या यातील विसंगतीमुळे इतर व खुल्या प्रवर्गातील लाभार्थी घरकुलांपासून वंचित राहिले आहेत. आजमितीस स्वत:ची जागा असूनही इतर व खुल्या प्रवर्गाचे उद्दिष्ट नसल्याने घरकुलात नंबर लागेल, या आशेवर हजारो लाभार्थी आहेत.नांदुरा तालुक्यात मागील सात-आठ वर्षांपासून मोठ्या संख्येने असणाऱ्या इतर व खुल्या प्रवर्गातील जनतेकरिता लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य घरकुलांचे उद्दिष्ट आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात नागरिक घरकुलापासून वंचित आहेत. सन २००९-१० मध्ये- ३४, २०१०-११ मध्ये -१९, २०११-१२ मध्ये- ५८, २०१२-१३ मध्ये- ००, २०१३-१४ मध्ये -००, २०१४-१५ मध्ये-१९, २०१५-१६ मध्ये- ४० असे सात वर्षांत केवळ १७० घरकुल इतर व खुल्या लाभार्थींना मिळाले. याच काळात एससी व एसटी प्रवर्गासाठी तब्बल १५५६ घरकुल मंजूर झाली आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास तालुक्यात इतर व खुल्या प्रवर्गाची लोकसंख्या खूप जास्त आहे; परंतु त्याचा कोठेही विचार न करता घरकुलांचे उद्दिष्ट वाटप करण्यात आले आहे. इंदिरा आवास योजना, आता नव्याने पंतप्रधान आवास योजना या नावाने सुरू करण्यात आली असून, यामधून १ लाख २० हजार, रोजगार हमी योजनेतून १७ हजार ८०० व शौचालयाचे १२ हजार, असे १ लाख ४९ हजार ८०० रुपये लाभ दिल्या जातो. या योजनेकरिता लाभार्थींजवळ स्वत:च्या मालकीची जागा असणे गरजेचे आहे. जागा नसल्यास ५०० स्क्वे. फूट जागा खरेदीसाठी दीनदयाल उपाध्याय योजनेमधून ५० हजार देण्यात येतात. या सर्व गोष्टी असूनही आतापर्यंत केवळ उद्दिष्ट न मिळाल्याने हजारो लोक घरकुलांपासून वंचित आहेत. २०१६-१७ या वर्षातही परिस्थिती तीच असून, आता नव्याने मंजूर होणाऱ्या उद्दिष्टांमध्ये तरी इतर व खुल्या प्रवर्गासाठी मोठ्या संख्येने घरकुल मंजूर होणे आवश्यक आहे. इतर व खुल्या प्रवर्गाच्या उद्दीष्टात वाए करण्यासाठी यापुर्वीही पाठपुरावा केल्या असून यावर्षी उद्दीष्ट नक्कीच वाढून मिळेल असे न झाल्यास या प्रवर्गातील अन्याय दूर करण्यासाठी शासनाकडे दाद मागावी लागेल. - सुनिता संतोष डिवरे, उपसभापती पं.स.नांदुरा