निराधार, अंध अपंग भुकेलेल्यांसाठी अन्नछत्र सुरू करून किन्ही सवडत, उंद्री, तोरणवाडा, वैरागड, चिंचपूर व पिंप्री कोरडे येथील पंचावन्न निराधारांना दररोज जेवणाचे घरपोच डबे पोहोचविण्याचे सेवकार्याची माहिती मिळाली. नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर किन्ही सवडत येथे भेट देत, प्राथमिक स्वरूपाची मदत सेवाभावी फाउंडेशनच्या वतीने केली भविष्यातही या अन्नछत्रासाठी यथायोग्य मदत करू, असे प्रतिपादन डहाके यांनी केले, तसेच समाजातील इतरही दानशूर व्यक्ती, संस्था यांनीही या सेवाकार्याचा वाटा उचलत मदतीचा हात देत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी या सेवा कार्यासाठी पुढाकार घेणारे तरुण सहकारी अमोल बोरपी यांच्यासह मुरलीधर क्षिरसागर, मनोहर कचाले, गणेश भारसाकळे, मुरलीधर महाराज हेलगे, समाधान क्षीरसागर, क्षत्रुगुंन बराटे, श्रीकृष्ण शेळके, कृष्णा मानकर, शिवा घोराडे, बंडू खरात, नारायण ठाकरे, हरी क्षीरसागर, यमुनाबाई घोराडे, वनिता बोरपी, उषा ठाकरे आदींचा सत्कार राम डहाके यांनी केला. अमोल बोरपी व सहकाऱ्यांचा आदर्श घ्यावा, जेणेकरून कुणी निराधार उपाशी राहणार नाही.
किन्ही सवडत येथील तरुणांच्या उपक्रमास दिली पाच हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:36 AM