ब्रह्मनंद जाधव / मेहकर (जि. बुलडाणा) बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत ५ हजार १५0 अंगणवाडीसेविका व मदतनिसांना वेतनश्रेणीची प्रतीक्षा असून, त्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. महिन्याकाठी अंगणवाडीसेविकांना ५ हजार १00 रुपये व मदतनिसांची केवळ २५00 रुपये अशा तुटपुंज्या मानधनावर प्रशासनाकडून बोळवण केली जात असल्याने जिल्ह्यातील ५ हजार १५0 सेविका व मदतनिसांची होरपळ होत आहे.लहान मुलांवर योग्य संस्कार करून त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना योग्य पोषण आहार देण्याकरिता सतत प्रयत्नशील असलेल्या अंगणवाडीसेविका व मदतनिसांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात २ हजार ५७५ अंगणवाडी केंद्र असून, प्रत्येक केंद्रावर एक अंगणवाडीसेविका व एक मदतनीस आहे. त्यानुसार जिल्ह्यात अंगणवाडीसेविका २ हजार ५७५ व अंगणवाडी मदतनीस २ हजार ५७५ अशा एकूण ५ हजार १५0 सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. परंतु, ५ हजार १५0 अंगणवाडीसेविका व मदतनिसांना गेल्या कित्येक वर्षांंंपासून प्रशासनाने वेतनश्रेणीच्या प्रतीक्षेत ठेवले आहे. अंगणवाडीसेविकांना ५ हजार १00 रुपये व मदतनिसांना केवळ २५00 रुपये, असे तुटपुंजे मानधन दिले जात आहे. मानधनाबरोबरच अंगणवाडीसेविका व मदतनिसांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्ह्यात ५0 पेक्षा जास्त अंगणवाडीसेविका, मदतनीस सेवानवृत्त झालेले आहेत; मात्र प्रशासनाकडून दीड वर्षांंंपासून प्रस्ताव पाठविण्यात न आल्याने सेवानवृत्त सेविका, मदतनिसांना सेवानवृत्तीच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. अंगणवाडीसेविका, मदतनिसांना मानधन पावती दर मानधनाच्या वेळी देण्याचा शासननिर्णय असूनसुद्धा, गेल्या दोन वर्षांंंपासून मानधनाची पावती सेविका, मदतनिसांना दिली जात नाही. तसेच मानधन यादी संबंधित नोटीस बोर्डाला लावण्यात येत नाही. बुलडाणा प्रकल्पाच्या सेविका, मदतनिसांचे इंधन बिल सन २0१३ पासून देण्यात आले नाही. मोताळा, बुलडाणा व चिखली प्रकल्प कार्यालयामध्ये तर अंगणवाडीसेविका, मदतनीस यांची माहिती उपलब्ध नसल्याने त्यांना पंचवार्षिक वाढ मिळाली नाही. तसेच काही मदतनिसांनी मार्च २00९-२0१0 मध्ये रिक्त जागेवर सेविका पदावर पदोन्नती मिळण्याकरिता अर्ज केले आहेत. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी आजपर्यंंंंत पदोन्नतीचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. अंगणवाडीसेविका, मदतनिसांच्या मानधनासह अनेक प्रश्न असल्याने जिल्ह्यातील सेविका, मदतनीस त्रस्त आहेत.
पाच हजार सेविका तुटपुंज्या मानधनावर
By admin | Published: March 17, 2016 2:27 AM