शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे पाच बळी, ६६५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 11:13 AM

Five victims of corona in Buldana district : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे आणखी पाच बळी गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे आणखी पाच बळी गेले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५ हजार ९८६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ५३२१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६६५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४०६ व रॅपीड टेस्टमधील २५९ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ४०४ तर रॅपिड टेस्टमधील ४९१७ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा शहरात ४९, तालुक्यात डोंगरखंडाळा, रायपूर, सुंदरखेड, पाडळी, पिं. सराई, चांडोळ, इरला, म्हसला, करडी, ढालसावंगी, रूईखेड, धाड, येळगांव, देऊळघाट, सागवन, कोलवड, भादोला याठिकाणी रुग्ण सापडले आहेत. मोताळा शहर १३, खामगांव शहर ४०, शेगांव शहर ४०, मलकापूर शहर १७, मलकापूर तालुक्यातील दाताळा ३, पिंपळखुटा दोन, धरणगांव तीन, दुधलगांव १, भालेगांव १, नरवेल १, देऊळगाव राजा शहर ११, दे. राजा तालुक्यातील सातेफळ २, सावखेड नागरे १, सिनगांव जहा दोन, खल्याळ गव्हाण २, सावखेड भोई २, पिंपळखुटा १, दे. मही ३, डोढ्रा एक, अंढेरा १ रुग्ण सापडला. सिंदखेड राजा शहरात २८, मेहकर शहर ४३, मेहकर तालुक्यातील गोहेगाव दोन, हिवरा आश्रम सहा, पांगरखेड एक, करंजी, सारंगपूर, लोणी गवळी, गुंजखेड, लव्हाळा चार, दे. माळी तीन, चिंचोली बोरे, अंजनी खु, शेंदला, पेनटाकळी, जानेफळ, मोहदरी, वाकड, मोहणा, डोणगांव पाच,  रुग्ण आढळून आले. संग्रामपूर शहरात १४, जळगांव जामोद शहरात १२, नांदुरा तालुक्यात बुर्टी दोन, पोटा दोन, लोणार शहरात १७, लोणार तालुक्यातील वढव दोन, रायगांव चार, बिबी, वझर आघाव, हत्ता, ताडेगांव, मातमळ, पहुर, सुलतानपूर २६, देऊळगांव चार व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. 

याठिकाणी झाले मृत्यूजिल्ह्यात पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील ६० वर्षीय पुरूष, छत्रपती नगर बुलडाणा येथील ६० वर्षीय पुरूष, मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील ८० वर्षीय पुरूष, मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथील ५३ वर्षीय पुरूष व मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ५५ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा