प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३८१ व रॅपीड टेस्टमधील ३५४ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ४२६, रॅपिड टेस्टमधील ५ हजार ३१८ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेले अहवालामध्ये बुलडाणा शहर व तालुका ९४, खामगाव १२५, शेगाव ५८, देऊळगाव राजा तालुका व शहर ४६, चिखली ९९, मेहकर २५, मलकापूर ९०, नांदुरा २८, लोणार २०, मोताळा ३९, जळगाव जामोद २५, सिंदखेड राजा ८६ संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ७३५ रुग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली तालुक्यातील आमोना येथील ८० वर्षीय पुरुष, खामगाव येथील ८५ वर्षीय पुरुष, गणेशपूर ता. खामगाव येथील ६५ वर्षीय महिला, विष्णूवाडी, मलकापूर येथील ७५ वर्षीय महिला, वाशिम येथील ४७ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच ९०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत २१०६८७ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत २९३४६ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी ३८६६ नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २१०६८७ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ३५८७० कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी २९३४६ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ६२७१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे पाच बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:21 AM