या टप्प्यात प्रवासाचा दहावा दिवस संपत असताना ध्वज मोहिमेने सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आणि जालना जिल्ह्यातील अंबड येथील टेकडीवर असलेल्या मत्स्योदरी मंदिर येथे भेट दिली. सिंदखेड राजामधील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी स्वराज्य ध्वज प्रतिमा नेण्यात आली. आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ७४ मीटर उंच असा जगातील सर्वात उंच भगवा ध्वज साकारला आहे. सर्व धर्माचे प्रतीक असलेल्या या झेंड्याच्या रथाचे मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील मासाहेब जिजाऊ यांच्या जन्माने पावन झालेल्या भूमीमध्ये आगमन झाले. त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजन राजे लखोजीराव जाधव यांचे सोळावे वंशज शिवाजी राजे जाधव व राजेंद्र अंभोरे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, अनुजा पाटील, नगराध्यक्ष सतीश तायडे, उपनगराध्यक्ष विजय तायडे, नगरसेवक गणेश झोरे, नरहरी तायडे, श्याम मेहत्रे, राजू आप्पा बोंद्रे, जगन मामा सहाने, मधुकर गव्हाड, सतीश काळे, महेश पवार, सिद्धार्थ जाधव, प्रेम कोरडे, संजय मेहेत्रे, कैलास मांडे, महादेव भुतेकर यांच्यासह गावातील महिला व पुरुष हे येथील भजनी मंडळाची उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन ॲड. संदीप मेहेत्रे यांनी केले. तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांनी मानले.
स्वराज्यध्वज मोहिमेच्या दुसरा टप्प्यात ध्वजपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:38 AM