खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल
बुलडाणा : येथील बसस्थानकाच्या परिसरात व मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून, सध्या पाऊस पडत असल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्या खड्ड्यांमधून वाहने ये-जा करताना अनेकांच्या अंगावर चिखलमय पाणी उडत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया मिळावा
बुलडाणा : खरीप हंगामाच्या तोंडावरच युरिया खताची मागणी वाढली होती. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पेरणीनंतरही काही शेतकरी युरिया खत टाकतात, त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
बुलडाण्यातील बाधितांची संख्या घटली
बुलडाणा : तालुक्यासह शहरातील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. १३ जुलै रोजी बुलडाणा तालुक्यात केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.