लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील अनेक शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात. यावर्षी कोरोनामुळे सहा महिने नुकसान सहन करावे लागल्याने आगामी दिवाळी सणात फुलांच्या भावात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पिकाच्या उत्पादनवाढीसाठी धडपड करीत असून, खत व्यवस्थापनासह इतर प्रक्रियेवर भर दिला जात आहे. गेल्या काही वषार्पासून घाटाखालील तालुक्यांमध्ये फुलशेतीचे प्रमाण वाढत आहे. त्यात प्रामुख्याने हंगामी फुलशेती असलेल्या झेंडूचे क्षेत्र अधिक आहे. घाटपुरी, पळशी बु. या गावांमध्ये झेंडूची लागवड होते. यंदा कोरोना संसगार्मुळे झेंडूच्या फुलांची लागवड कमी झाली. त्यामुळे विजया दशमीला मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने या फुलांना समाधानकारक दर मिळाले. आता दिवाळीच्या सणातही या फुलांचे महत्त्व असते. त्यामुळे शेतकरी फुल पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यासाठी पिकाला खत देणे, पाणी व्यवस्थापनासह आंतर मशागतीवर जोर देत आहेत. दिवाळीच्या सणात डझेंडूच्या फुलांना महत्त्व असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी असते. नियमित लागवड करणाया अनेक शेतकयांनी झेंडूची लागवड केली नाही. परिणामी या फुलांचे उत्पादन घटले.
खामगाव तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 12:38 PM
Khamgaon News घाटपुरी, पळशी बु. या गावांमध्ये झेंडूची लागवड होते.
ठळक मुद्देकोरोना संसगार्मुळे झेंडूच्या फुलांची लागवड कमी झाली.परिणामी या फुलांचे उत्पादन घटले.