.............चौकट...........
फाटक्या नोटा घेण्यात बँकांना नुकसान नाही
बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या स्वच्छ नोटाअंतर्गत खराब नोटा ग्राहकांकडून घेणे बंधनकारक आहे. नंतर त्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्या जातात व रिझर्व्ह बँक त्या नोटांच्या बदल्यात बँकांना तेवढीच रक्कम देते. यात बँकेचे नुकसान नाही; पण वर्षातून एक ते दोन वेळेस रिझर्व्ह बँक फाटक्या नोटा घेत असल्याने तेवढी रक्कम गुंतून राहते.
...........चौकट.........
नोटांसाठी निकृष्ट दर्जाच्या कागदाचा वापर
नोटाबंदीनंतर घाईघाईत नवीन दोन हजार रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या होत्या. या नोटांसाठी वापरण्यात आलेला कागद अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता. त्यामुळे त्या लवकर खराब होत आहेत. मात्र, बँकांना ग्राहकांकडून फाटक्या नोटा घेणे बंधनकारक आहे. ग्राहकांना कमिशन एजंटकडे पाठवणे चुकीचे आहे. कोणी तक्रार केली तर रिझर्व्ह बँक त्या बँकेवर कारवाई करू शकते.