शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

चारा छावण्यांचे प्रस्ताव अडकले लालफितशाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 4:02 PM

खामगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात सगळीकडेच चारा टंचाई निर्माण झालेली असताना, अद्याप कुठेही चारा छावण्या उभारण्यात आलेल्या नाहीत.

ठळक मुद्देजिल्हयातील २० गावांकडून चारा छावणीची मागणी करण्यात आली होती.प्रशासनाच्या वतीने स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्तावही मागविण्यात आले. अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय झाला नाही.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात सगळीकडेच चारा टंचाई निर्माण झालेली असताना, अद्याप कुठेही चारा छावण्या उभारण्यात आलेल्या नाहीत. जिल्हयातील २० गावांकडून चारा छावणीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्तावही मागविण्यात आले, मात्र हे प्रस्ताव लालफितशाहीत अडकले आहेत. अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न कायम आहे.जिल्हयात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. मार्च महिन्यातच पशुपालकांसमोर चारअया पाण्याचा जिल्ह्यात १०, ७२, ९३७ एवेढे पशुधन आहे. यात लहान पशुधन ६४, ४३७, मोठे पशुधन ५, ९५, ५४९ तर ४, १२, ९५१ शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. त्यानुसार प्रतिदिन १४,०१४ मेट्रीक टन चाºयाची आवश्यकता आहे. यानुसार प्रतिमहा १, २०, ४३१ मेट्रिक टन चारा लागतो. माहे मार्च ते जून २०१९ पर्यंत ४, ८१, ७२४ मेट्रिक टन चाºयाची आवश्यकता, ३,७०, १७३ मेट्रिक टन चाºयाची उपलब्धता, त्यानुसार १, ११, ५५१ मेट्रिक टन चाºयाची तूट. तूट भरून काढण्यासाठी विविध योजनांद्वारे बियाण्यांचे वाटप व यातून १, ८१, ३३० मेट्रिक टन एवढ्या हिरव्या चाºयाचे उत्पादन असे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते. ३६,२६६ मेट्रिक टन वाळलेल्या चाºयाचे उत्पादनही गृहीत धरण्यात आले होते.गत रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ४२ हजार हेक्टरवर रब्बीचा झालेला पेरा व यातून ८५, ८१० मेट्रिक टन वाळलेला चारा उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. अशा परिस्थितीत चाºयाची तूट भरून काढण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमधून १, २२, ००० मेट्रिक टन चारा उत्पादनाची अपेक्षाही जिल्हा प्रशासनाने केली होती. करण्यात आलेल्या नियोजनानुसार जूनपर्यंत चारा टंचाई भासणार नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. परंतु यावर्षीची पाणीपरिस्थिती पाहता, सध्या सगळीकडेच चाराटंचाई निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. दरम्यान चाराटंचाईचा संभाव्य आराखडाही तयार करण्यात आला. परंतु पशुपालकांना अद्याप त्याचा लाभ झाला नसल्याचे दिसून येत आहे.यामुळे जनावरांचे हाल होत असून लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्या, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

या गावांमधून झाली चारा छावणीची मागणी!चारा छावण्या सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तशी मागणी करणे अभिप्रेत आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत बुलडाणा तालुक्यात मासरूळ, चिखली तालुक्यात धोत्रा, मंगरूळ, आमखेड, सिंदखेडराजा तालुक्यात शिवणी टाका, लोणार तालुक्यात मांडवा, खामगाव तालुक्यात पारखेड, आमसरी, उमरा अटाळी व शिराळा, नांदुरा तालुक्यात महाळुंगी, वळती, मोताळा तालुक्यात माळेगाव, मलकापूर तालुक्यात दाताळा, पान्हेरा, वाघुड, शेगाव तालुक्यात वरूड, लासुरा, जळगाव जामोद तालुक्यात जामोद, संग्रामपूर तालुक्यात टूनकी याप्रमाणे एकुण २१ चारा छावण्यांची मागणी करण्यात आली आहे. छावण्यांमध्ये ६३ हजार जनावरांसाठी १८९० लक्ष रूपये प्रति महिना याप्रमाणे खर्च येणार आहे. दरम्यान, चारा छावण्या सुरू करण्यासाठी तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. परंतु अद्याप यावर निर्णय झाला नसल्याचे दिसून येत आहे.

चारा छावण्यांबाबतचे नियोजन तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. यावर लवकर निर्णय घेण्यात येणार आहे.-डॉ.एन.एच.बोहरासहा.आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, बुलडाणा.

सध्या तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. डोंगराळ भागातील परिस्थिती अत्यंत कठीण आहे. जनावरांना चारा नसल्याने चराईसाठी केवळ जनावरांना फिरवून आणावे लागत आहे.-रामदास कोकाटे, शेतकरी, वझर, ता.खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा