- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : परतीच्या पावसाने चारा पिकांचेही अतोनात नुकसान केले आहे. शेतात साठवून ठेवलेले कुटार भिजले असून, धऱ्यावरील उभे गवतही सडले आहे. त्यामुळे गुरांची भूक भागवायची कशी? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून चाºयाचे नियोजन सध्या सुरू आहे.परतीच्या पावसाने पिकांबरोबरच जनावरांच्या चाºयालाही फटका बसला आहे. जिल्ह्यात आधीच चारा पिकांची लागवड कमी प्रमाणात होते. त्यात आता पावसाने चाºयाचे नुकसान केल्याने चारा टंचाईचे संकट जिल्ह्यावर निर्माण झाले आहे. काही शेतकºयांनी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे कुटार शेतात साठवून ठेवलेले होते. ते सुद्धा या पावसाने भिजले आहे. काही कुटाराच्या ढिगांना बुरशी चढली आहे. शेताच्या बांधावर असलेले गवतही काळवंडले आहे. जिल्ह्यात गुरांची संख्या लाखोंच्या घरात आहे, परंतू त्यातुलनेत उपलब्ध चारा दरवर्षी कमी असतो. यावर्षी उपलब्ध चाºयाचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचे गवत सडल्याने जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पशुपालक चिंताग्रस्त झाला आहे. सर्वत्र पीक नुकसानाचा सर्वे सुरू असताना पशुसंवर्धन विभागाकडून चाºयाचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुकास्तरावरून उपलब्ध चारा व किती चाºयाचे नुकसान झाले याची माहिती घेण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून पशुसंवर्धन विभागाकडून माहिती गोळा करण्यात येत आहे.शेतकºयांना चारा पिकाचे बियाणे उपलब्ध होणारपावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे मका, ज्वारी, सोयाबीन या पिकांपासून मिळणारा चारा आता उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शेतकºयांना चारा उत्पादक बियाणे वितरीत करण्याचे संकेत पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी रविवारी जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेताना दिले. पावसामुळे ज्या ठिकाणी चाºयाचे नुकसान झाले आहे, त्याचा प्रथमिक सर्वे सुरू आहे. जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी चाºयाचे योग्य नियोजन करण्यात येत आहे. सध्या प्रत्येक तालुकास्तरावरून उपलब्ध चाºयाचा आढावा घेण्यात येत आहे.- डॉ. पी. जी. बोरकर,जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन.