- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खरीप हंगामातील पेरणीच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना इतर कंपन्यांची बियाणे आणि खते खरेदी करण्याची सक्ती विविध कृषी केंद्रावरून केली जात आहे. त्यामुळे खामगाव आणि परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले असून, याकडे कृषी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कृषी विभागाची भरारी पथके नावालाच असल्याने, कोरोना संकट काळात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे ‘लोकमत’च्या रिअॅलिटी चेकमध्ये आढळून आले.पावसाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ही संधी साधत काही कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांना नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांसोबत इतर बियाणे आणि खते खरेदीची सक्ती करीत आहेत.
तरच मिळतात बियाणे! महाबीजच्या बियाण्यांसोबतच इतर कंपनीची बियाणे आणि खते, किटकनाशक खरेदीस नकार दिला. तर शेतकऱ्यांना कपाशीची बियाणे दिली जात नाही. त्याचवेळी दुसऱ्या कंपनीचे बियाणे आणि खत खरेदी केल्यास, तत्काळ बियाणे उपलब्ध होत असल्याचे प्रकार उजेडात येत आहेत.
महाबीजच्या कपाशी बियाण्यांंसोबतच इतर कंपनीची बियाणे आणि खरेदीस संमती दिली. त्यावेळी बियाणे उपलब्ध होते. मात्र, खत आणि इतर कंपनीचे बियाणे खरेदीस नकार दिला. त्यावेळी कृषी केंद्र संचालकाने बियाणे देण्यास नकार दिला. -प्रमोद सावरकरशेतकरी, भालेगाव बाजार, ता. खामगाव.