लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील काही कृषी केंद्र धारकांनी त्यांच्या दुकानात दर्शनी भागात दरफलक लावण्यात आले नसल्याची परिस्थिती ‘लोकमत स्टिंग आॅपरेशन’ दरम्यान समोर आली आहे.कृषी सेवा केंद्र धारकांना दुकानाच्या दर्शनी भागात बियाणे, खतांचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. परंतु खामगाव शहरात अनेक दुकानांमध्ये असे दरपत्रक लावण्यात आलेले नाही.काही दुकानांमध्ये दरपत्रक लावण्यात आले आहेसुध्दा; परंतु ते ग्राहकांना व्यवस्थीत दिसत नाही. यामुळे शासनाच्या आदेशाला बगल दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोना आजाराच्या पृष्ठभुमिवर गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही परिस्थिीती पाहता, दुकानांवर दर्शनी भागात दरपत्रक लावल्यास ग्राहकांना खते, बियाण्याचे दर सहज वाचता येतात. भाव विचारण्यासाठी दुकानदारांशी संवाद साधण्याची गरज पडत नाही. पर्यायाने एकमेकांशी संपर्क कमी करण्यास मदत होते. परंतु खामगाव शहरातील अनेक दुकानांमध्ये दरपत्रक नसल्याचे दिसून येते. असे केले स्टिंग...खामगाव शहरातील काही दुकानांमध्ये दरपत्रक लावण्यात आले नाहीत, अशी माहिती लोकमत प्रतिनिधीला मिळाली. यानंतर रविवारी दुपारी शहरातील मुख्य मार्गावरील दुकानांमध्ये जावून परिस्थितीची पाहणी करण्यात आली. यावेळी काही दुकानदारांनी दरपत्रकल लावले नसल्याचे दिसून आले तर काही दुकानांमधील दरपत्रक व्यवस्थीत दिसत नव्हते.
दिलेल्या वेळेनुसार दुकाने उघडण्याकडे दुर्लक्ष!काही दुकानांच्या शटरवर दुकाने उघडे ठेवण्याची सुचना लिहिलेली दिसून आली. प्रत्यक्षात मात्र दुकान बंदच असल्याचे दिसून आले. ५ ते ६ दुकाने बंदच होती. काही दुकानांमध्ये असलेल्या व्यक्तींनी मास्कही लावला नव्हता. याकडे कृषी विभगाने लक्ष देवून नियमांचे पालन करवून घेण्याची गरज आहे.दरपत्रक लावण्याच्या सुचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. तरीसुध्दा पथकामार्फत पाणी करून ज्या दुकानांमध्ये दरपत्रक आढळणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.-गणेश गिरी, तालुका कृषी अधिकारी, खामगाव.