लोकमत न्यूज नेटवर्क
लाेणार : गत काही दिवसांपासून लाेणार शहरासह तालुक्यात काेराेनाचा संसर्ग वाढत आहे़. याचवेळी नगरपालिकेला शहरात साेडियम हायपाेक्लाेराईडच्या फवारणीचा विसर पडला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींचेही याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे.
गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने तसेच ग्रामपंचयतींनी साेडियम हायपाेक्लाेराईड फवारणी केली. परंतु, सध्या शहरात व तालुक्यात जवळपास ४७० कोरोनाचे रुग्ण असतानाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कोवीड - १९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोणार शहरासह प्रत्येक गावात निर्जंतुकीकरण करणे तसेच गावाची स्वच्छता करणे गरजेचे आहे. परंतु, याचा प्रशासनाला विसर पडला आहे. गतवर्षी कोरोना जनजागृती व फवारणीवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु, कोरोनाचा सध्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रशासनाकडून त्यावर उपयोजना होताना दिसून येत नाहीत.
शहरातील प्रत्येक प्रभागात येत्या दोन दिवसात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे.
- अशोक निचंग, आरोग्य निरीक्षक, नगरपालिका, लोणार