या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नितीन राजपूत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
मोबाईल विक्री व दुरूस्ती केंद्रचालकांना कोरोना काळात व्यवसाय करणे जिकिरीचे होत असताना, शासनाने वेळोवेळी लावलेल्या प्रतिबंधांमुळे मोबाईल व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे, लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका मोबाईल विक्रेत्यांना बसला असल्याने मोबाईल विक्रेत्यांनादेखील अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नितीन राजपूत यांनी यावेळी स्पष्ट केले. मोबाईल असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोपाल राजपूत, फिरोज खान पठाण, शेख असिफ, प्रशांत कल्याणकर, नरेश भुसारी, विनोद परिहार, नरेंद्र शेटे, सचिन पडघान, दत्ता फुलझाडे, अनुप सोदडकर, मंगेश जाधव, शेख मोसीन, सुनील हांडे, शेख राजू, महेश लेंबे, शेख शकील, बाळू कोल्हे, राहुल लेंबे, शेख शफिक, शेख सादिक, मुन्ना लोखंडे, संदीप भुतेकर, शेख पप्पू, लखन चौधरी, निंबाराम चौधरी, शेख समीर, शेख शाहीर, राहुल उंबरकर, सनी ललवाणी आदी मोबाईल विक्री व दुरूस्ती व्यावसायिकांची यावेळी उपस्थिती होती.