यामध्ये शाखाध्यक्ष संदेश कुडके, उपाध्यक्ष ऐश्वर्य पदवाड, शुभम ढवळे, रामेश्वर देशमुख, कृष्णा नानोटे, अनिकेत पाटणे, शिवम पंडित, ओमकार जाधव, योगेश साखरे यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ खेडेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सौरभ खेडेकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संभाजी ब्रिगेडची कार्यप्रणाली व विचार समजावून सांगितले. यावेळी प्रदेश सचिव मदन दहातोंडे, विकास खंडागळे, आकाश लंबे पाटील, नीलेश मोरे, श्रावण भुसारी, संजय काकडे महाराज, शिवशंकर शेळके, आदित्य झाल्टे, धनंजय देशमुख, सागर महाशब्दे, देवराज सवडतकर, महेश मापारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गाव तिथे शाखा उभारू
संभाजी ब्रिगेड राष्ट्राला समर्पित कॅडरबेस असे संघटन आहे. व्यवस्था परिवर्तन हा संभाजी ब्रिगेडचा श्वास आहे. या सामाजिक परिवर्तनाचा धागा होत चिखली तालुका व शहरांमध्ये अनेक युवक संघटनेमध्ये सामील होऊन गाव तिथे शाखा उभारून संघटना अधिकाधिक मजबूत करण्याचा सूर या कार्यक्रमातून उमटला.