शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कृउबासच्या माजी सभापतींनी नियमबाह्य पध्दतीने उचलला अग्रीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:05 PM

माजी सभापतींनी सचिवांची स्वाक्षरी नसतानाही १ लक्ष ४० हजार रूपयांच्या अग्रीम उचलल्याचे उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतींनी नियमबाह्य पध्दतीने अग्रीम उचलल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. कृउबासमधील अनियमिता प्रकरणी एका चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये माजी सभापतींनी सचिवांची स्वाक्षरी नसतानाही १ लक्ष ४० हजार रूपयांच्या अग्रीम उचलल्याचे उघडकीस आले आहे.खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरकारभार आणि गैर व्यवहार प्रकरणी बुलडाणा सहकारी संस्थेच्या (पणन) विशेष लेखा परिक्षक वर्ग-२ यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशी समितीने आपला विस्तृत अहवाल जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सादर केला. बाजार समितीतील अनियमिततेप्रकरणी चार मुद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष रामराव टाले यांनी बाजार समितीच्या रेकॉर्ड नुसार साडेपाच लाखाचा अग्रीम उचलला आहे. १४ मे २०१८ ते ०४ मे २०१९ या कालावधीत सभापतींनी वेळोवेळी तब्बल १२ वेळा हा अग्रीम उचलला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेकॉर्डनुसार ही रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळे सदर रक्कम तीन दिवसांच्या आत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात जमा करण्याच्या सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी सभापतींना केल्या आहेत. यामध्ये एक लक्ष ४० हजार रूपयांच्या अग्रीम उचल केल्याप्रकरणी गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.चौकशी अहवालात माजी सभापतींवर गंभीर आक्षेप!यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष टाले यांनी ०६ मार्च २०१९ रोजी व्हावचर क्रमांक १६०१ नुसार एक लाख ४० हजार रुपयांचा उचल केला आहे. मात्र, अग्रीम उचल करतेवेळी अग्रीम मागणी अर्ज घेतलेला नाही. व्हावचरवर सचिवांची स्वाक्षरी देखील नाही. तसेच कोणत्या कार्यालयीन कामासाठी, कोणत्या कोर्ट केससाठी हा अग्रीम उचलण्यात आला. याबाबत अर्थबोध होत नाही. सभापती किंवा सदस्य यांना समितीच्या निधीमधून अग्रीम देण्याची तरतूद नसताना नियमबाह्य अग्रीम उचलणे, ही बाब उचित नाही. सदर अग्रीम रक्कम व्याजासह बाजार समितीमध्ये भरणा करणे आवश्यक असल्याचेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश!बाजार समितीचे माजी सचिव संतोष टाले यांच्याकडून त्यांनी नियमबाह्य पध्दतीने रोख स्वरूपात उचल केलेली अग्रीम रक्कम एक लक्ष ४० हजार आणि त्यावरील व्याजाची वसुली कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी, तसा अहवात त्वरीत सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा यांनी ३ सष्टेंबर रोजी प्रशासक तथा सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांना दिले आहेत.

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतींनी नियमबाह्य पध्दतीने अग्रीमाची उचल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. सचिवांच्या स्वाक्षरी शिवाय एक लाख ४० हजार रुपयांची रक्कम त्यांनी उचलली आहे. ही रक्कम व्याजासह वसूल करणेबाबत कारवाईचे आदेशीत केले आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल.-डॉ. महेश चव्हाणजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगाव