शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय पाणी पुरवठा योजनांची माजी राज्यमंत्र्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 4:40 PM

डोणगाव : नववर्षाच्या पर्वावर बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यासह समिती अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १४२ गावांचा दौरा सुरू केला .

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५८ गावातील पाणीपुरवठा योजनेचे विदारक चित्र. ६ दिवसात ५८ गावांना भेटी देवून तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला.

डोणगाव : नववर्षाच्या पर्वावर बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यासह समिती अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १४२ गावांचा दौरा सुरू केला असून १ ते ६ जानेवारी दरम्यान ६ दिवसात ५८ गावांना भेटी देवून तेथील गावकºयांशी संवाद साधीत शासकीय नळपाणी पुरवठा योजनेचे विदारक चित्र जाणून घेतले.जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने ६ दिवसात ५८ गावापैकी जवळपास ५१ गावांमध्ये गावकºयांना नळयोजनेव्दारे पाणीच मिळत नसल्याचे दिसून आले. तर ६ जानेवारीला सुबोध सावजी यांनी डोणगाव येथील साडेचार कोटीच्या नळयोजनेची पाहणी केली. यावेळी योजनेचा केवळ सांगाडा उभा होता तर नळयोजनेतून पाणी येत नव्हते. ३५ वर्षापुर्वीच्या जुन्या नळयोजनेतून महिन्यात चारवेळा डोणगावला पाणी मिळत असून साडेचार कोटी रूपये खर्चुनही अधिकाºयांच्या भ्रष्टाचारामुळे डोणगावला पाणी नाही व वरून वाढीव योजनेची मागणी या सर्व गोष्टीचा आढावा घेवून सायंकाळी ५ वाजता माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी आठवडी बाजरात सभा घेऊन जनतेला अधिकाºयांनी प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजनेत केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती देवून जनतेचे हाल पाण्याअभावी कसे होत आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर जळगाव जामोद, संग्रामपूर या भागातील दौरा करणार असल्याचे सांगून समाजकारणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते शैलेश सावजी, नामदेव काळे, अबरार खान मिल्ली, जितेंद्र अंबेकर, रहीम खान, उस्मान शाह, शाम इंगळेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शैलेश सावजी यांनी डोणगाव येथील राष्टÑीय पेयजल योजनेची माहिती देऊन या गावात वार्ड क्रमांक २ मध्ये नळयोजनेला पाणी नसताना ही पाईपलाईन खोदण्यात आली येवढा मोठा भ्रष्टाचार असताना या योजनेसाठी वाढीव पैसा मागण्यात आला हा कशासाठी ३० वर्षापुर्वीच्या योजनेतून महिन्यात एकदा पाणी मिळते अशी माहिती दिली. (वार्ताहर)

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा