जळगाव जामोद: जळगाव जामोद मतदारसंघात ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. आज विजय निनाजी सातव, मारोती सुरडकर, तुळशीराम टोपरे, गणेश अर्जून दाभाडे तर काल प्रशां त तायडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता पंचकोनी सामन्यात भाजपाचे आ.डॉ.संजय कुटे, भारिप बसमंचे प्रसेनजीत पाटील व काँग्रेसचे रामविजय बुरुंगले यांच्यात टक्कर आहे. तर राकॉचे प्रकाशसेठ ढोकणे, मनसेचे गजानन वाघ, सेनेचे संतोष घाटोळ व अपक्ष रमेशचंद्र घोलप हे स्पर्धेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जळगाव मतदार संघावर नेहमी जातीची समीकरणे मांडली जातात. या मतदार संघात माळी, कुणबी व पाटील व बारी या समाजाची सर्वाधिक मते आहेत. या तीन समाजानंतर मुस्लिम व बौध्द समाजाची मतसंख्या सर्वाधिक आहे.व या समाजाचे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.त्यामुळे रंगत वाढली आहे. बहुजन समाज पार्टीकडून ज्ञानदेव विष्णू इंगळे हे रिंगणात उतरले आहेत. तर समाजवादी पार्टीची सायकल करीमखान समदखान यांनी चालवायला घेतली आहे. सेनेचे संतोष घाटोळ बहूजन समाज पार्टीकडून प्रमोद घाटे, महाराष्ट्र परिवर्तन सेनेकडून बबनराव मोटूजी बोदडे हे रिंगणात आहेत तर वामनराव गणपत आखरे, भारत इंगळे, श्रीकृष्ण कुरवाळे, जावेद हुसेन ताजमाऊल हुसेन, सुधाकर श्रीरामसा नंदाने, शेख मोहीनोद्दीन शे.सलिमोद्दीन व सुधाकर नंदाने हे उमेदवार अपक्ष आहेत.
चौघांची उमेदवारी मागे, १८ उमेदवार रिंगणात
By admin | Published: October 02, 2014 12:15 AM