सिंदखेडराजा : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, २४ डिसेंबर रोजी विझोरा, कुंबेपळ आणि साखरखेर्डा ग्रामपंचायतींसाठी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अर्ज ऑनलाइन दाखल करावे लागत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उमेदवार आणि सूचक यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावा लागत आहे. ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने निवडणूक जाहीर झाल्यापासून जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र यासाठी लागणारे दस्तावेज जमा करण्यातच १० ते १५ दिवस लागत आहेत. निवडणुका असल्याने तहसील कार्यालयातून वेळीच उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे सोमवार ते बुधवार या तिन्ही दिवशी तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी होणार आहे. २४ डिसेंबर रोजी विझोरा आणि कुंबेफळ येथील प्रत्येकी एक अर्ज तर साखरखेर्डा येथील वाॅर्ड क्रमांक चार आणि सहामधून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुनील सावंत यांनी दिली.