साखरखेर्डा : परिसरात या वर्षी जाेरदार पाऊस हाेत आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर येत आहेत. अनेक पूल लहान असल्याने वाहतूक ठप्प हाेते. भोगावती नदीवरील पुलासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले असून, काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे .
चार वर्षांपासून साखरखेर्डा परिसरात आणि तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने, दरवर्षी ओल्या दुष्काळाचे सावट पसरले. कधी-कधी अतिवृष्टीमुळे पिके सडत आहेत. या वर्षीही १ जूनपासूनच पावसाला साखरखेर्डा मंडळात सुरुवात झाली. पाऊस पडला नाही, म्हणून पीक आले नाही, अशी वेळ आली नाही. अतिवृष्टीमुळे पिके, बियाणे खापली अशी ओरड झाली. ४५ दिवसांत दहा वेळा भोगावती नदी दुथडी भरून वाहली. कोराडी नदीही वाहली. सतत पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने, भोगावती नदीवरील क्षतिग्रस्त होत असलेला पूल नव्याने निर्माण करण्याची गरज झाली आहे. श्रीप्रल्हाद महाराज संस्थानचे विश्वस्त उल्हासराव देशपांडे यांनी भोगावती नदीवरील क्षतिग्रस्त झालेल्या पुलाची उंची वाढवून नव्याने बांधणी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते व वाहातूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला हाेता. प्रल्हाद महाराज यांचे शिष्य नागपुरात मोठ्या प्रमाणात असल्याने उल्हास देशपांडे यांना त्यासाठी पाठपुरावा केला. भोगावती नदीवरील पुलाच्या पुनर्निर्माण कार्यासाठी ३ कोटी ९० लाख मंजूर करण्यात आले. पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
परिसरात मुसळधार पाऊस
साखरखेर्डा परिसरात गत काही वर्षांपासून मुसळधार पाऊस हाेत आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान हाेत आहे, तसेच नदी, नाले दुथळी भरून वाहत आहेत. अशातच अनेक पूल कमी उंचीचे असल्यामुळे त्यावरून पाणी वाहते. अनेक गावांचा संपर्क पुलावरून पाणी वाहत असल्याने तुटताे. त्यामुळे भाेगावती नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी हाेत हाेती. या पुलासाठी निधी मंजूर झाल्याने, आता काम तातडीने सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
काेट
या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, या पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर केला आहे.
उल्हासराव देशपांडे
ग्रामपंचायत सदस्य तथा विश्वस्त, प्रल्हाद महाराज संस्थान