लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे शुक्रवारी जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यू पावलेल्यांची संख्या ५३ झाली आहे. दुसरीकचे ९१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने बाधितांचा आकडा ३,६०५ झाला आहे. सध्या जिल्ह्यात ९८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.शुक्रवारी उपचारादरम्यान सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील ७३ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा तालुक्यातील फत्तेपूर येथील ६० वर्षाचा व्यक्ती, मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील ७० वर्षीय महिला आणि लोणार तालुक्यातील शिवणी पिसा येथील ७४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. परिणामी जिल्ह्यात कारोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी प्रत्यक्षात कोरोनाचा जिल्ह्यातील मृत्यू दर हा अद्यापही १.४७ टक्क्यांच्या आसपास आहे. दरम्यान गत एक आठवड्यात जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आठवडाभरात जवळपास दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शुक्रवारी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवाल आणि रॅपीड टेस्ट ्से मिळून एकूण ४०० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ३०९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा १४, सावळी आणि गुम्मी प्रत्येकी एक, जानेफळ सात, डेणगाव सहा, मेहकर दोन, खामगाव सहा, लाखनवाडा एक, माटरगाव चार, शेगाव पाच, धानोरा विटाळी एक, बारलिंगा सहा, वाघाळा एक, पिंपळगांव पुडे एक, सि. राजा चार, देऊळगाव राजा पाच, मेंडगाव एक, देऊळगाव मही एक, लोणार एक, धामणगाव बढे तीन, तरोडा एक, सुलतानपूर एक, शिवणी पिसा एक, संग्रामपूर एक, पेसोडा एक, आसलगाव एक, खेर्डा एक, मडाखेड एक, वाशिम जिल्ह्यातील दोन, अकोला जिल्ह्यातील दगडखेड येथील एक, वडगाव येथील एक, हाता येथील एक, जठारपेठ अकोला येथील तीन जणांचा समावेश आहे. एकंदरीत या ९१ जणांमध्ये सात जण हे अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आहेत.
१६७ रुग्णांची कोरोनावर मातशुक्रवारी १६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा शहरातील ११, बोरखेडी येथील एक, धाड येथील दोन, सागवन येथील एक, सावरगाव एक, मलकापूर नऊ, मोताळा दोन, माळेगाव एक, तपोवन तीन, हनवतखेड दोन, हिवरखेड तीन, नांदुरा सात, खामगाव ४३, भालेगांव सहा, तेल्हारा एक, पिं. राजा चार, जळका तेली एक, चिखली सात, मेरा बुद्रूक १३, अमडापूर एक, शेलगाव आटोळ एक, शेवगा एक, सवणा एक, सातगाव भुसारी एक, देऊळगाव राजा नऊ, मेहकर पाच, लोणार आठ, शेगाव आठ आणि अकोला जिल्ह्यातील एक असे १६७ जण कोरोना मुक्त झाले आहेत. १९ हजार ३१० संदिग्ध रुग्णांचेही अहवाल निगेटीव्ह आले तर कोरोना बाधीत असलेल्यांपैकी २, ५७२ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ९८० कोरोना बाधीतांवर उपचार सुरू आहेत.