पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यात ९८, खामगाव ४९, शेगाव ९०, देऊळगाव राजा २४, चिखली ३८, मेहकर ९, मलकापूर ५३, नांदुरा ४६, लोणार २७, मोताळा ४१, जळगाव जामोद ५९, सिंदखेड राजा ४८ आणि संग्रमापूर तालुक्यात १० जणांचा समावेश आहे. दुसरीकडे उपचारादरम्यान संग्रामपूर तालुक्यातील वझर्डा येथील ५५ वर्षीय व्यक्ती, खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रूक येथील ७५ वर्षीय महिला, शिरला नेमाने येथील २५ वर्षीय व्यक्ती आमि शेगाव येथील एसबीआय कॉलनीमधील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दरम्यान ८२४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तपासणीसाठी पाठविलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैक ४ लाख ४४ हजार ३९८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ७६ हजार २०३ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
--२९५० अहवालांची प्रतीक्षा--
अद्यापही २ हजार ९५० संदिग्ध अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ८१ हजार ७८२ जण कोरोना बाधीत झाले असून यापैकी ५ हजार ३४ सक्रीय रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ५४५ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे.