माेताळा : शहरातील एका किराणा दुकानासमाेरील खाद्यतेलासह ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चार चाेरट्यांना बाेराखेडी पाेलिसांनी ४ सप्टेंबर राेजी अटक केली. या चाेरट्यांना ५ सप्टेंबर राेजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवारपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली.
मोहमंद नाशीर मोहमंद मनसुर अबला यांच्या आठवडी बाजारात असलेल्या किराणा दुकानासमाेरील ६०० लिटर खाद्यतेल व इतर साहित्य असा ९० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चाेरट्यांनी २९ ते ३० जुलैच्या दरम्यान लंपास केला हाेता. या प्रकरणी बाेराखेडी पाेलिसांनी तपास करून आरोपी शेख रेहान ऊर्फ रिजवान शेख बुडन (२४, रा. पांढरी प्लॉट मलकापूर, इरफान शाह ऊर्फ काल्या अताउल्लाह शाह (२१, रा. पांढरी प्लॉट मलकापूर), अफसर शाह हैदर शाह (२३, रा. मोताळा), शेख इम्रान शेख सलीम (२६ रा. मोताळा) यांना अटक केली. या आराेपींना ५ सप्टेंबर राेजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य आराेपी फरार असून पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत. पुढील तपास बाेराखेडी पाेलीस करीत आहेत.