लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: चिखली येथील राऊतवाडी या अधिकृत बस थांब्यावर हात देऊनही एसटी न थांबविल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशान्वये विभागीय कार्यालयाने बुलडाणा आगाराचे चार कर्मचारी निलंबित केल्याची कारवाई ६ ऑक्टोबर रोजी केली.बुलडाणा आगाराच्या भुमराळा-बुलडाणा व मेहकर-बुलडाणा या दोन्ही गाड्या चिखली बसस्थानकावरून बुलडाण्याकडे येत होत्या. यावेळी राऊतवाडी या अधिकृत बसथांब्यावर प्रवाशांनी हात देऊनही गाड्या थांबल्या नाहीत. याबाबत प्रवाशांनी अनेक वेळा आगार प्रमुख यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या होत्या; मात्र लेखी तक्रारी करण्यात न आल्यामुळे आतापर्यंत कार्यवाही करण्यात आली नाही; मात्र ६ ऑक्टोबर रोजी दोन्ही गाड्या हात दाखवूनही थांबल्या नसल्याच्या तक्रारी युवा सेना शहर प्रमुख विलास घोलप यांनी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली. यांनी या तक्रारीची दखल घेत एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागीय कार्यालयास चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. याबाबत विभागीय कार्यालयाने चौकशी करून चालक आर.ए. अवसरमोल, आर.एस. सिरसाठ तसेच वाहक पी.बी. गडाख व जी.एस. आरमाळ यांना एका आदेशान्वये निलंबित केले. या घटनेमुळे बुलडाण्यातील कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
एसटीचे चार कर्मचारी निलंबित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:28 AM
बुलडाणा: चिखली येथील राऊतवाडी या अधिकृत बस थांब्यावर हात देऊनही एसटी न थांबविल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशान्वये विभागीय कार्यालयाने बुलडाणा आगाराचे चार कर्मचारी निलंबित केल्याची कारवाई ६ ऑक्टोबर रोजी केली.
ठळक मुद्देपरिवहन मंत्री रावते यांच्या आदेशान्वये कारवाईहात देऊनही एसटी न थांबविल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीवरून निलंबन