बुधवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टद्वारे तपासण्यात आलेल्या २१४४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १,७७६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ३६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये चिखली शहरातील ४३, हातणी १, कोलारा १२, अंत्री खेडेकर १, धोडप १, दे. धनगर ५, शेलूद २, मंगरूळ नवघरे २, इसरुळ २, मुरादपूर १, वळती २, खैरव ३, धोत्रा भणगोजी १, भानखेड २, अंचरवाडी २, सवणा १, खंडाळा १, मेरा खुर्द १, वाघोरा १, सावरगाव डुकरे ३, तेल्हारा १, भोरसा भोरसी १, दहीगाव ३, अमडापूर १, आमखेड १, गजरकेड ३, सि. राजा २, रताळी १, मोहाडी १, भरोसा दोन, दुसरबीड १, खैरखेड १, सातगाव १, कामगाव २७, हिवरखेड १८, बोथाकाजी १, बोरी अडगाव ३ अंत्रज ६, भालेगाव १, रोहणा १, सुटाळा बुद्रूक १, घाटपुरी १, पिंप्राळा १, अजिसपूर १, माळवंडी २, बिरसिंगपूर १, दहीद बु. २, साखळी १, सागवन १, गिरडा १, दत्तपूर १, मोंढाळा १, बुलडाणा ४९, शेगाव ३१, जानोरी ९, जवळपा २, चिंचोली १, सोनाळा १, लोणार १, आरडव १, मेहकर १, बाऱ्हई २, जानेफळ १९, हिवरा आश्रम १, जळगांव जामोद १४, सुनगाव १, कुरणगड ४, देऊळगाव राजा १५, वाढोणा १, चिंचोली बुरूकुल १, आळंद १, देऊळगाव मही २, डोढ्रा १, नांदुरा १५, पोटळी १, चांदुर बिस्वा १, नारखेड १, माळेगाव गोंड १, मुर्ती २, सिंदखेड १, मोताला १, मलकापूर १, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येतील १, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील २ संशयितांचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान चिखली तालुक्यातील तेल्हारा येथील ६५ वर्षीय व्यक्ती आणि धोत्रा भणगोजी येथील येथील ८० वर्षीय महिला, देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड वायाळ येथील ६७ वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव येथील एका ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बुधवारी १२३ जणांनी कोरोनावर मात केली.
६,३३२ अहवालाची प्रतीक्षा--
जिल्ह्यातील ६,३३२ संदिग्धांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १७ हजार २८० झाली आहे. त्यापैकी २,१४४ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत जिल्ह्यात १९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.