मोताळा : बुलडाणा जिल्ह्यातल मोताळा-मलकापूर मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये चार जण ठार झाले असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील पहिला अपघात हा मोताळा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर चिंचपूर फाट्यानजीक घडला तर दुसरा अपघात मलकापूर शहरालगत फार्मसी कॉलेजनजीक घडला.मोताळ््यानजीकच्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले तर मलकापूर येथील अपघात एका विद्यार्थ्याचा ट्रक खाली दबून मृत्यू झाला तर त्याचे चार सहकारी गंभीर जखमी आहेत. मोताळ््यानजीक चिंचपूर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने मलकापूरकडूनबुलडाण्याकडे जाणार्या प्रवाशी अॅटोला (एमएच-२०-सीएच-४३२८) धडक दिली. यात तन्वीर शेख शौकत (वय दोन वर्षे), राशेदाबी शेख शौकत (२०) आणि शेख शौकत (२५) या तिघांचा मृत्यू झाला असून ते बुलडाणा येथील इंदिरानगरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान, जखमीमध्ये जुबेदाबी शेख फारूख (४०), शेख उमेद शेख फारूख (१९), शेख इलियास शेख इजाज, शेख फारूख शेख रऊफ (४०) साबीया शेख परवीन (१९, सर्व रा. इंदिरानगर बुलडाणा) आणि लक्ष्मण पोपे (६५, रा. सावरगाव, ता. मलकापूर) हे सहा जण जखमी झाले आहेत.त्यांच्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघाताचे वृत्त कळताच बोराखेडीचे ठाणेदार अविनाश भांबरे आपल्या कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अपघाताची भिषणता पहाता स्थानिक नागरिक नाना देशमुख, शेरखाँ, जाकिरभाई, सोपान धोरण, अण्णा देशमुख, मोबीन अहेमद, सलीम ठेकेदार यांनी जखमींना रुग्णवाहीकेत ठेवण्यासमदत केली.--वाहतूक विस्कळीत--रात्री पावणेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने अॅटोस धडक देऊन घटनास्थळावरून मलकापूरच्या दिशेने पोबारा केला. अपघातामुळे मोताळा-मलकापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्याते वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमल्यामुळे प्रारंभी मदत कार्यात व नंतर वाहतूक सुरळीत करण्यात मोठीे अडचण गेली. मलकापूरमध्येही अपघात एक ठार, चार जखमी मलकापूर शहरानजीक यशोधाम परिसरात कापूस घेऊन जाणारा भरधाव वेगातील ट्रकपलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील दीपक सुरूशे (२२) हा जागीच ठार झाल्याची माहिती मलकापूर उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नाफडे यांनी दिली. दरम्यान, या अपघातामध्ये आणखी चार जण जखमी झाले असून त्यांच्यापैकी एकाला बुलडाणा येथे हलविण्यात आले असून उर्वरित तिघांवर मलकापूर येथीलच खासगी रुग्णालयात उपचार करण्यातयेत आहेत. मोताळ््याकडून मलकापूरकडे कापूस घेऊन जाणार्या भरधाव वेगातील ट्रकच्या चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटून तो मलकापूर फॉर्मसी कॉलेजनजीक पलटी झाला. त्यावेळी गॅदरिंग आटोपून परतनारे पाच फॉर्मसी कॉलेजचे विद्यार्थी त्याखाली दबले. त्यात दीपक सुरुशेचा मृत्यू झाला तर त्याचे अन्य चार सहकारी जखमी झाले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात दोन अपघातामध्ये चार ठार; १० गंभीर, मृतामध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 12:44 AM