शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी चार बळी, ६१९ नवीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 11:09 AM

Buldhana Corona Update : ४७९२ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६१९ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात ९ एप्रिल रोजी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५४११ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४७९२ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६१९ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३१२ व रॅपीड टेस्टमधील ३०७ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ५५६ तर रॅपिड टेस्टमधील ४२३६ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवालामध्ये बुलडाणा शहरातील ९८, तालुक्यातील गोंधनखेड, मासरूळ, कुलमखेड दोन, डोमरूळ दोन, धाड तीन, रूईखेड, पिं. सराई दोन, सावळी पाच, म्हसला, कुंबेफळ, चांडोळ, करडी येथे प्रत्येक एक, रायपूर येथे पाच रुग्णांचा समावेश आहे. मोताळा शहरात सहा, मोताळा तालुक्यातील पिं. देवी दोन, मुर्ती, पुन्हई, शेलापूर, धानखेड, वरूड, निपाणा, माळेगांव प्रत्येकी एक आव्हा तीन, उऱ्हा दोन, जयपूर पाच, उबाळखेड दोन, रोहीणखेड तीन, धा. बढे सहा, किन्होळा एक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. खामगांव शहरात ४६, खामगांव तालुक्याती सुटाळा तीन, हिवरा २, आंबेटाकळी एक, शेगांव शहरात २६, शेगांव तालुक्यातील मानेगांव, पहुरजिरा, मोरगांव, खेर्डा, टाकळी धारव, हिंगणा, मच्छींद्रखेड, गौलखेड, शिरसगांव, नागझरी, जवळा, माटरगांव येथे रुग्ण आढळून आले.चिखली शहरात आठ, चिखली तालुठ्यातील अंत्री खेडेकर १२, चंदनपूर एक, रोहडा, इसोली एक, मुरादपूर, शेलूद तीन, खैराव, कोलारा, कनारखेड, माळशेंबा दोन, पळसखेड नाईक दोन, मलकापूर शहरात ७३, मलकापूर तालुक्यातील बहापूरा एक, वाघुड एक, देवधाबा, दुधलगांव, वडोदा, घिर्णी तीन, दाताळा दोन, दे. राजा शहरात ३३, दे. राजा तालुका चिंचखेड चार, दे. मही तीन, अंढेरा दोन, सिनगांव जहा दोन, वाकी, सावंगी टेकाळे, सरंबा, सिंदखेड राजा शहरात २, सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड तीन, साखरखेर्डा तीन, डावरगांव, आलापूर, मेहकर शहरात २१, मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी दोन, डोणगांव २, लोणी गवळी २, संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी २, जळगांव जामोद शहरात ५, नांदुरा शहरात १८, नांदुरा तालुक्यातील डिघी २, वडनेर ९, शेलगांव मुकूंद तीन, टाकरखेड २, पोटा ३, आलमपूर ४, हिंगणे गव्हाड ३, लोणार शहरात ६, लोणार तालुक्यातील सावरगांव दोन, टिटवी पाच, बिबी १५, सुलतानपूर ८, दाभा २ पॉझिटिव्ह आहेत.

याठिकाणी झाले मृत्यूजिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यमध्ये बुलडाणा तालुक्यातील दहीद येथील ४७ वर्षीय पुरूष, जयपूर ता. मोताळा येथील ६५ वर्षीय पुरूष, भोरसा भोरसी ता. चिखली येथील ६० वर्षीय पुरूष, चांगेफळ ता. मेहकर येथील ३२ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा