२०१९
३२०८ जिल्हा रुग्णालयात जन्मलेली एकूण बालके
१७२० मुले
१४८८ मुली
२०२०
२५६० जिल्हा रुग्णालयात जन्मलेली एकूण बालके
१३२७ मुले
१२३४ मुली
चार किलोंपेक्षा कमी
जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या वर्षभरामध्ये जन्माला आलेल्या २ हजार ५६० मुलांमध्ये सर्व मुले ही चार किलोंपेक्षा कमी वजनाचीच आहेत. साडेतीन किलोंच्या आसपास जन्माला आलेल्या मुलांचे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे, तर सर्वसाधारण अडीच ते तीन किलो वजनाचीच मुले येथे जन्माला येतात.
शहरी मुलांचे प्रमाण अधिक
लठ्ठ मुले जन्माला येण्यामागे शहरी मुलांचे प्रमाणच अधिक आहे. ग्रामीण भागातील मुले साधारणत: अडीच ते तीन किलो वजनाचीच जन्माला येतात. गरोदर महिलांच्या पोषण आहाराकडे सर्वजण आता लक्ष देतात.