बीजप्रक्रिया मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
बुलडाणा : बीजप्रक्रिया मोहीम यशस्वी केल्याबद्दल संचालकांकडून शेतकरी व कृषी सहाय्यकांचे कौतुक करण्यात आले आहे. बुलडाणा उपविभागामध्ये बीजप्रक्रियेची २ हजार ४११ प्रात्यक्षिके राबविली असून, त्यामध्ये १७ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
पावसामुळे लांबली रस्ता कामे
मोताळा : मे महिन्यामध्ये तालुक्यातील अनेक भागात रस्ता दुरुस्तीची कामे सुरू होती. परंतु पावसाळ्यामुळे रस्त्यांची कामे लांबवण्यात आली. आता पावसाने उघडीप दिली असली तरी रस्त्याची कामे बंदच आहेत.
वीजपुरवठा खंडित
बुलडाणा : शहरानजीक असलेल्या सागवन परिसरात शनिवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. दुपारी उशिरापर्यंत विद्युतपुरवठा बंद होता. शहरातही काही भागात वीज खंडित झाल्याचे दिसून आले.
निधी वितरणात अडचणी
बुलडाणा : पंधराव्या वित्त आयाेगातील निधी वितरणासाठी काही ग्रामपंचायतींना अडचणी येत आहेत. कोरोनामुळे अनेक ग्रामपंचायतींना गावातील विकासकामांसाठी यापूर्वीही निधी मिळालेला नाही. त्यात आता तांत्रिक अडचणींमुळे निधी वितरणास खोड निर्माण होत आहे.