बुलडाणा : पुलाच्या कामासाठी खाेदलेल्या खड्यात भरधाव काेसळल्याने लाेणार तालुक्यातील चार शिक्षकांचा मृत्यू झाला़. ही घटना १३ जून राेजी रात्री हिंगाेली जिल्ह्यातील सेनगाव जवळ घडली़. गजानन अंकुश सानप, विजय ठाकरे, त्र्यंबक थाेरवे अशी मृतकाची नावे आहेत़. एका मृतकाचे नाव कळू शकले नाही़
लाेणार तालुक्यातील खळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गजानन सानप व इतर तिघे जण मुलांना खासगी शिकवणी लावण्यासाठी नांदेड येथे कारने गेले हाेते़. तेथून परत गावी येत असताना नांदेड जिल्ह्यातील सेनगावजवळ पुलासाठी केलेल्या खड्यात त्यांची कार पडली़ पाण्यात पडताच कारचे चारही गेट लाॅक झाले़. त्यामुळे, कारमधील एकालाही बाहेर पडता न आल्याने त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला़.
माहितीदर्शक फलक नसल्याने झाला घात
सेनगाव ते येलदरी महामार्गाचे काम सुरु आहे. एका नाल्याच्या पुलासाठी मोठा खड्डा खाेदलेला आहे. या खड्ड्यात रविवारी मध्यरात्री एक कार पडली. खड्यावजळ माहितीदर्शक फलक लावलेला नसल्याने चालकाला हा खड्डा दिसला नाही़ मात्र, या ठिकाणी पुलाचे काम चालु असल्याचा कोणताही दर्शनी फलक लावण्यात आला नाही.त्यामुळे, अंधारात कार सरळ खड्यात पडली़ खड्यातील पाण्यात पडताबराेबर कारचे चारही गेट लाॅक झाले हाेते़.