बुलडाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा रविवार, १० जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत एका सत्रामध्ये होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून ४ हजार ८ परीक्षार्थी बसणार असून परीक्षेसाठी बुलडाणा येथील १३ परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.शिवाजी विद्यालय, सुवर्ण नगर येथील परीक्षा केंद्रात ४८० परीक्षार्थी, एडेड हायस्कूल चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३६०, शारदा ज्ञानपीठ चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३३६, सहकार विद्या मंदीर चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ४३२, गुरूकुल ज्ञानपीठ स्कुल सागवन येथे २४०, रामभाऊ लिंगाडे पॉलीटेक्नीक कॉलेज चिखली रोड परीक्षा केंद्रात ३१२, जिजामाता महाविद्यालय चिखली रोड परीक्षा केंद्रात १९२, सेंट जोसेफ इंग्लीश हायस्कूल, राजर्षी शाहू पॉलीटेक्नीक शाहू नगर सागवण येथे २८८ परीक्षार्थी, भारत विद्यालय चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३८४ परीक्षार्थी, डॉ.राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालय जुना अजिसपूर रोड येथे १४४, ऊर्दु हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज जोहर नगर येथील परीक्षा केंद्रात २४०, पंकज लद्धड इन्स्टीट्युट आॅफ टेक्नोलॉजी आणि मॅनेजमेंट स्टडीज चिखली रोड येथील परीक्षात केंद्रात ३६०, जिजामाता महाविद्यालय चिखली रोड येथे १९२ व प्रबोधन विद्यालय जिजामाता नगर परीक्षा केंद्रात २४० परीक्षार्थी परीक्षेस बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १३ परीक्षा केंद्रात १६७ खोल्यांच्या माध्यमातून चार हजार आठ परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा कक्षात सकाळी १० वाजता प्रवेश देण्यात येणार असून परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र व काळ्या शाईचे बॉल पॉर्इंट पेन/पेन्सील, ओळखीचे दोन पुरावे व त्याच्या छायांकित प्रती आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास गुन्हा परीक्षा उपकेंद्राच्या प्रवेशद्वारावरच परीक्षेस प्रवेश देण्यापूर्वी उमेदवारांची तपासणी पोलीसांमार्फत करण्यात येणार आहे. त्याशिवाय परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिल्या जाणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षा कक्षामध्ये परीक्षार्थ्यांजवळ कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास सदर उमेदवाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती केंद्र प्रमुख तथा आरडीसी ललीत वराडे यांनी दिली आहे.